Gondwana University, Gadchiroli
MIDC Road Complex, Gadchiroli-442605,MH.(India)
विद्यापीठ गीत गोंडवाना नव तपोवन आदिजन वन परिसरी विश्वविद्यापीठ हे ज्ञानाचर्णा या मंदिरी || धृ ||
स्त्रोत आदिम संस्कृतीचा, या प्रदेशी निर्मळ शास्त्र, विद्या अन कलेतून अमृताचे ओहळ त्या झ-यांना करूनि विकसित मिळवू विद्यासागरी || १ ||
शास्त्र, वाडःमय, तंत्रविद्या व्यावसायिक ज्ञानही अर्थ वा वाणिज्य क्रीडा अन कला विज्ञानही नित इथे बहरेल प्रतिभा नवयुवांच्या अंतरी || २ ||
ज्ञानगंगा पुण्यपावन जीव तिजसंगे शिव उचित संस्कारेच जगती श्रेष्ठ ठरतो मानव उंच , उन्नत झेप घेतिल छात्र इथले अंबरी || ३ ||
दलित , पीडीत , दीन , शोषित सर्व जाती बांधव ज्ञानपीठी या निमंत्रित शिक्षणोत्सुक मानव प्राप्त विद्येनेच मनुजा अभ्युदय या भुवरी || ४ ||
बन्धुता , स्वातंत्र , समता , न्यायनीतीला जपावे विश्वशांतीस्तव नवे आव्हान हे पेलून घ्यावे ज्ञान , अस्त्रानीच निश्चित विजय जीवन संगरी || ५ ||
|